राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून सहभागी झालेल्या 16 मंत्र्यांची आज बैठक होणार आहे. मुंबईतील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 11 वाजता पवार मंत्र्यांशी चर्चा करतील. त्यात एल्गार परिषदेच्या तपास व त्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे.

तसेच कायदा सुव्यवस्था हा राज्याचा विषय असताना केंद्र सरकारने परस्पर हा तपास स्वत:कडे घेणे अयोग्य आहे. शिवाय, त्याला राज्याने मान्यता देणे त्याहून अयोग्य आहे. तपासाची सूत्रे एनआयएकडे गेली असली तरी राज्याने स्वतंत्र तपास करावा, अशी भूमिकाही पवार यांनी मांडली आहे.

Loading...

याचप्रमाणे बैठकीत २४ फेब्रुवारीपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, महाविकास आघाडी सरकारच्या कारभारासह राज्यातील महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर फक्त राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक शरद पवारांनी बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, 16 मंत्र्यांच्या कामांचा आढावा शरद पवार घेणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील हे बारा कॅबिनेट मंत्री आहेत. तर दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे हे चौघे राज्यमंत्री आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका