शरद पवार राणेच्या घरी ! राजकीय चर्चेला उधाण

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काही वेळापूर्वीच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. कणकवली येथील राणेंच्या घरी शरद पवार दाखल झाले आहेत. परंतु ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत असलं तरी आगामी निवडणुकांमुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या शरद पवार हे मागील दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदूर्गाच्या तिकीटासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार असल्याचा दावा काँग्रेससोबत झालेल्या जागावाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादीनं केला होता. त्यामुळे पवार-राणेंच्या भेटीला महत्व प्राप्त झाल आहे. पवार-राणे यांच्या या भेटीतून महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे जुळणार का ? हे येणारा काळच सांगू शकतो.

उद्धव ठाकरेंना आरक्षणातील काही कळतं का? : राणे