व्हिडिओ: बोगस बियाणे शेतकऱ्यांकडे आलेच कसे; शरद पवार यांची थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा

यवतमाळ : यवतमाळच्या मांगलादेवी गावातील शेतकरी श्याम उघडे यांच्या शेतात शरद पवार यांनी भेट दिली. बोगस बीटी बियाण्यामुळे कपाशीसाठी केलेला सर्व खर्च वाया गेला. आता जगावे कसे, अशी व्यथा पवार यांच्यासमोर मांडली. सरकार किंवा कृषी खात्यातर्फे कुणीही अजून नुकसानीची पाहणी केलेली नाही.
श्याम उघडे यांचे कपाशीचे पीक बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाले आहे. सरकार किंवा कृषी खात्यातर्फे कुणीही अद्याप नुकसानीची पाहणी केलेली नाही. आज यवतमाळ दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

यावेळी, बोंडअळीची रेझिस्टन्स पॉवर वाढली आहे. परिणामी बीटी बियाणे लावूनही बोंडअळीवर काहीच परिणाम होत नाही. हे बीटी बियाणे बदलण्याची वेळ आली आहे. पण ते बियाणे शेतकऱ्यांकडे आलेच कसे, याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार यांची शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा

You might also like
Comments
Loading...