मुंबई : आज (१० जानेवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सह्याद्री अतिथी गृहावर एसटी संपबाबत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यानंतर या बैठकीसंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हा, संप मागे घ्या, मागण्या मान्य होतील, असे आश्वासन शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.
तसेच यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींकडून वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव करण्यात आला. आमची चूक झाली, आता आम्ही वकील बदलत आहोत, असेही प्रतिनिधींनी म्हटले आहे.
एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार आता गुणरत्न सदावर्ते यांच्या जागी वकील सतीश पेंडसे यांच्याकडे युक्तिवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच यावेळी गुणरत्न सदावर्ते स्वतः डिप्रेशनमध्ये आले असावेत, अशी टीकाही करण्यात आली.
दरम्यान, शरद पवार यांच्या उपस्थितीत २२ कर्मचारी संघटनांसोबत ही बैठक झाली असून या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपबाबत तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा झाली. तसेच यावेळी महाराष्ट्रातील प्रवासी वर्ग अत्यंत महत्वाचा आहे. मात्र एसटी संपामुळे मागील दोन महिन्यांपासून प्रवाश्यांचे हाल झाले आहेत. एसटी संपावर तोडगा काढण्याचा सरकारने सर्वोत्तपरी प्रयत्न केला. त्यामुळे कामावर परत या, एसटी पूर्वपदावर आणा. सर्व मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- विश्वास नांगरे पाटील यांच्यासह १८ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
- ‘कुणालातरी निवडणुका उरकण्याची…’, संजय राऊतांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला
- “…त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल”
- ‘…या काळात देशात दररोज ४ ते ८ लाख रुग्णसंख्या आढळू शकते’, आयआयटी प्राध्यापकाचा दावा