पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये नितीन गडकरी आणि शरद पवारांची भेट

पुणे: केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली आहे. जवळपास अर्धातास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

bagdure

देशभरात झालेल्या पोटनिवडणूका आणि पालघर निकालानंतर सेना-भाजपमध्ये निर्माण झालेल्या टोकाच्या संघर्षमय वातावरणात हि बैठक झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत, केंद्रातील भाजप सरकारच्या चार वर्षपूर्ती निमित्ताने सर्वच केंद्रीय मंत्र्याकडून पत्रकार परीषदेच आयोजन करण्यात येत आहे. आज नितीन गडकरी यांनी देखील पुण्यामध्ये पत्रकार परीषद घेत मोदी सरकारच्या कामांचा पाढा वाचून दाखवला. दरम्यान, हि परिषद संपल्यानंतर पंचतारांकित हॉटेल जेडब्ल्यू मॅरियेट येथे शरद पवार आणि नितीन गडकरींची भेट झाली आहे. या बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुखही हजर होते.

या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, राजकीय चर्चांना सुरुवात होताच नितीन गडकरी यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून भेटीचे फोटो शेअर करत पालखी महामार्ग आणि नागपूरच्या मेट्रो ब्रॉडगेज प्रकल्पावर भेट झाल्याची माहिती दिली आहे.

You might also like
Comments
Loading...