कर्ज फेडू नका, मी काय ते बघतो; पवारांचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिलासा

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत, सोलापूर, साताराचा दुष्काळ दौरा संपवून ते सध्या बीडमध्ये आहेत. सोमवारी दौरा सुरु असतानाच एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं पवार यांना समजलं. त्यामुळे त्यांनी थेट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जात भेट घेतली आहे.

Loading...

आष्टी तालुक्यातील इमनगावचे कांदा उत्पादक शेतकरी शरद साबळे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे. हि बातमी समजताच शरद पवार आणि धनंजय मुंडे यांनी तातडीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी साबळे कुटुंबाने कर्ज फेडण्याबद्दल चिंता व्यक्त केली.

यावेळी शरद पवार यांनी शेतकरी कुटुंबाला धीर देत आपण त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. तसेच कर्ज फेडू नका, मी काय ते बघतो, असा दिलासा दिला आहे.Loading…


Loading…

Loading...