fbpx

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात तब्बल दीड तास खलबतं

टीम महाराष्ट्र देशा: एकीकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत स्टेज शेअर न करण्याची भूमिका घेतली तर काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर तब्बल दीड तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेंना उधान आलं आहे.

ही भेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संदर्भात असल्याचं बोललं जात आहे. मात्र येत्या ७ डिसेंबरला होत असलेल्या विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला एक वेगळ राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा तपशील अद्याप जरी गुलदस्त्यात असला तरी या बैठकीत अनेक राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

1 Comment

Click here to post a comment