मोदींच्या मंत्रीमंडळात शरद पवार पुन्हा कृषिमंत्री ?

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याचे वृत्त ECONOMIC TIMES ने दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची चर्चा सुरु होती. आज मात्र ECONOMIC TIMES थेट शरद पवार यांचे नाव घेऊन बातमी दिली आहे. शरद पवार यांना कृषीमंत्री पद दिले जाण्याची सुद्धा जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र या सगळ्या चर्चांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस इन्कार केला आहे.

नितीन गडकरी आणि शरद पवार पुण्यात दोन कार्यक्रमाला एकाच व्यासपीठावर होते परंतु या दोन्ही नेत्यांनी राजकीय भाष्य करण्याच टाळाल होत.

मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा या आठवड्यात विस्तार होणार आहे. मोदी हे चीनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाशी भाजपशी बिहारमध्ये आघाडी झाली आहे. त्यामुळे या पक्षाच्या दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे.

You might also like
Comments
Loading...