तिसऱ्या आघाडी: शरद पवार-ममता बॅनर्जी एकत्र ?

mamata--and--pawar-sharad

टीम महाराष्ट्र देशा- तिसऱ्या आघाडीची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली असून राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात ‘तिसरी आघाडी’ उभारण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र एकत्र आल्याचं चित्र आहे. येत्या २७ आणि २८ मार्च रोजी दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांची याच मुद्द्यावरून बैठक होणार आहे. त्या बैठकीचे पहिले निमंत्रण शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांनाच दिले असून त्यांनीही ते स्वीकारले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जर भविष्यात खरच तिसरी आघाडी झाली तर एकप्रकारे भाजप पेक्षा कॉंग्रेसला जास्त त्रासदायक ठरणार असून पवार यांच्या या राजकीय डावपेचामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. दैनिक सामनाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दिल्लीतील बैठकीला आपण नक्की उपस्थित राहू असा शब्द ममता बॅनर्जी यांनी निमंत्रण घेऊन गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना दिला आहे. ही माहिती पटेल यांनीच ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर पत्रकारांना दिली.शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात तिसरी आघाडी उभारण्याचा हे दोन्ही नेते प्रयत्न करणार आहेत. त्यासाठीच दिल्लीत बैठक होत असून या बैठकीला ममता उपस्थित राहणार आहेत असे पटेल यांनी सांगितले.