Sharad Pawar | मुंबई : एकनाथ शिंदे गटातील नेत्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. काही दिवसांपुर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे. राष्ट्रवादी (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू नेते दिलीप कोल्हे (Dilip Kolhe) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
आज संध्याकाळी सात वाजता वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
दिलीप कोल्हे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू माणले जात होते. तर पक्षातील स्थानिक नेतृत्वांना कंटाळून दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर येत आहे. अशातच, दिलीप कोल्हे आपल्या कार्यकर्त्यांसह आता मुंबईला निघाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दिलीप कोल्हे आपल्या समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Kirtikar | “वडीलांनी साथ सोडली असेल पण मी मरेपर्यंत उद्धव-आदित्य ठाकरे यांच्यासोबत राहणार” – अमोल कीर्तिकर
- Sanjay Raut | “महागाई कमी झाली हो!”, सामनातून संजय राऊतांचा हल्लाबोल
- Kirit Somaiya | “ठाकरे सरकारने कोर्टाची फसवणूक केली, खोटे बोलले” ; किरीट सोमय्यांचा मोठा आरोप
- Sushma Andhare | “दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही”, सुषमा अंधारेंचा राणेंना खोचक टोला
- Sushma Andhare | “लाव रे तो व्हिडीओ हा त्यांचा…”, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर घणाघात