शरद पवार लिजेंड नेता तर उद्धव ठाकरे संवेदनशील : पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हा माझ्यासाठी एक धक्कादायक प्रसंग होता. असं विधान भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केल आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांना त्यांच्या फेसबुकवर काही दिवसांपूर्वी केलेल्या पोस्टमुळे पंकजा मुंडे यांच्या बंडखोरी करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, असे विचारण्यात आले यावर त्या म्हणाल्या, बंड करण्यासाठी माझ्याकडे कोणताही कारण नाही. मात्र व्यक्त होणं आणि पक्षविरोधी असणं या दोन वेगळ्या बाबी, माझ्यावर आरएसएसचे संस्कार असताना पक्ष का सोडेन? असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी विचरला.

माझं व्यक्त होणं हे नैसर्गिक आहे. मी राजकारणाच्या अनेक छटा पहिल्या आहेत. मी अन्याय झाला असं मी कधीच म्हटलं नाही. पराभवानंतर मी जबाबदारी स्वीकारली होती. पराभवाविषयी मी नाराज नाही. माझा झालेला पराभव माझा पराभव आहे कुणाचा विजय नाही, असे भावना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.

तसेच पराभूत झाल्यावर इतक्या धावपळीत उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून सांत्वन केलं. “तू पराभूत झाली याच वाईट वाटलं, पण काळजी करू नकोस” अस उद्धव ठाकरे बोलल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष चालावे अस मला वाटत तर आपण आता विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी अस देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

शेवटी त्यांना शरद पवार कसे नेते आहेत असे विचारल्यास शरद पवार लिजेंड नेता असल्याचे त्यांनी सांगितले. तर अजित पवार राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत संवेदनशील नेता आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगला मित्र असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. तर धनंजय मुंडे अग्रेसिव नेता, तर चंद्रकांत पाटील आज्ञाधारी नेता असल्याच त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या :