‘शरद पवार काँग्रेसपुढे गुडघे टेकून महाआघाडीत सामील झाले आहेत’

blank

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही काळापूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करून पक्षाला रामराम ठोकला होता. तेच पवार आता काँग्रेसपुढे गुडघे टेकून महाआघाडीत सामील झाले आहेत. अशी बोचरी टीका भाजपचे नेते आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली आहे.

शरद पवार यांनी काँग्रेस का सोडली होती? असा प्रश्न देखील गोयल यांनी यावेळी उपस्थित केला . येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पवारांचा निश्चित पराभव करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला .

शिवसेनेलाच विचारा युती करणार आहे की नाही?, असा प्रश्न विचारत त्यांनी युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलावला आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शरद पवार आणि कुटुंबीय सातत्याने लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहे.