मुंबई : शेतकऱ्यांना मिळालेल्या एफआरपी दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मी आज कोणासोबतही, मी केवळ शेतकऱ्यांच्याजवळ आहे. योग्य वेळ येताच मी माझी भूमिका स्पष्ट करेल असे म्हणत शेतकऱ्यांच्या एफआरपी आणि एफआरपीच्या तीन तुकड्यांबद्दलच्या मुद्द्यांवरु शरद पवार यांना लक्ष्य केले. आम्ही शरद पवारांचे गुलाम नाही, असे स्पष्टपणे त्यांनी म्हटलं.
भाजपला शेतीतला काही कळत नाही, शेतीशी यांचा संबंध नाही, असे म्हणत सरकारने यांची मतं घेतली. जर, पवार मोदींचीच भाषा बोलणार असतील तर अवघड आहे. एफआरपीचे तुकडे करायच्या मुद्दयावर यांनी केंद्र सरकारच्या हो ला हो मिळवला. एफआरपीचे तुकडे शरद पवार पडू देणार नाहीत, असे म्हणतात. केंद्र सरकारच्या रमेशचंद्र समितीनेच तीन तुकड्यातील एफआरपीचा प्रस्ताव का दिला, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी विचारला आहे.
कृषीमूल्य आयोग दरवर्षी एफआरपी जाहीर करत असते, मग याचवेळी एफआरपीसोबत एक नोट का दिली, की तीन तुकड्यांमध्ये एफआरपी द्यावी, याची जबाबदारी केंद्र सरकार का घेत नाहीत, असे म्हणत सर्वच राजकीय पक्ष एक असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले. शरद पवार हे कारखानदारांच्याच बाजुने आहेत, पवारांनी असं व्हायला पाहिजे, असे म्हटल्यास, आम्हीही तसेच म्हणावे असे थोडीच आहे. आम्ही काय त्यांचे गुलाम आहोत का? असे म्हणत राजू शेट्टींनी शरद पवार यांच्या भूमिकेला आपलं समर्थन नसल्याचं स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
- ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का?; नितेश राणे संतापले
- पलटवार! ‘एनसीबीने ज्याला सोडले तो राष्ट्रवादीच्याच जवळचा’; फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<