‘शरद पवार केंद्राची ऑफर न स्विकारण्याइतके कच्च्या गुरुचे चेले नाहीत’; भाजपचा टोला

चंद्रकांत पाटील

मुंबई : उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन वीजटंचाईला कोल इंडिया कंपनी जबाबदार असल्याचे सांगितले. केंद्रातील या कंपन्यांनी कोळसा टंचाई निर्माण केल्यानेच कोळसाटंचाई निर्माण झाली आहे असा आरोप त्यांनी केला होता. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘केंद्राने कोळसा दिला नाही म्हणून वीज कमी निर्माण होणार आहे, असे म्हणत आहेत. पण हे सांगणार नाही की, केंद्राने आग्रह धरला होता की पावसामुळे कोळसा कमी मिळेल. वेळीच साठा करा पण तो आम्ही केला नाही हे सरकार सांगणार नाही. तसे नाचता येईना अंगण वाकडे. शरद पवारांना केंद्राने तुम्ही आमच्याबरोबर सरकार बनवा अशी ऑफर दिली होती तर न स्विकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. केंद्रामध्ये सरकार असणाऱ्या पक्षासोबत महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याला त्यांनी प्राधान्य दिले असते.

त्यामुळे आता सर्वसामान्य माणसांना हे काय म्हणतात आणि त्याचा काय अर्थ होतो हे नीट कळतं. महाविकास आघाडीतील नाराजी ही काहीतरी ताटात आणखी काहीतरी पाडून घेण्यासाठी असते. त्यामुळे त्याच्यावरून काही निष्कर्ष काढण्याचे कारण नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या