शरद पवार शेतकऱ्यांचे नेते नाहीत तर…- प्रकाश आंबेडकर

पुणे: शरद पवार हे शेतकऱ्यांचे नाही तर शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगसमूहाचे नेते असल्याची घणाघाती टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शेतकरी जोपर्यत जातीवर मतदान करत राहील तोपर्यंत त्यांची अवस्था बदलणार नसल्याचंही ते म्हणाले. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते.

देशभरात पुकारण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे, राज्य तसेच देशभरात हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आपल्या मागण्यासाठी आंदोलन छेडले आहे. आज सकाळीच बोलत असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांनी आता मागे न हटता लढा तीव्र करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आपला या आंदोलनाला पाठिंबा असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय,

दरम्यान, शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेवर आंबेडकर यांना विचारलं असता त्यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमावेळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर सरकारने घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न चिन्ह निर्माण केलं आहे.

धनगर समाजात फूट कशी पडले याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. दगडफेक करणाऱ्या भाजपच्या लोकांना केवळ समजूत देऊन सोडण्यात आले तर इतर लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप यावेळी आंबेडकर यांनी केला.

You might also like
Comments
Loading...