शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी आहेत – बाळा नांदगावकर

पुणे: शरद पवारांचे बोट धरून अनेक लोक राजकारणात आले आहेत. अगदी गुजरातचे लोकपण आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. मात्र पवार साहेब तुम्हाला एक पी (पद्मविभूषण ) मिळालाय दुसरा पी (पंतप्रधानपद ) कधी मिळणार, तसेच पवार हे आम्हाला बाळासाहेबांच्या जागी आहेत असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शरद पवार यांची चांगलीच स्तुती केली आहे, माजी खासदार अशोकराव मोहोळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना नांदगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा शरद पवारांचे बोट धरत राजकारण आल्याच सांगितल होत याचा धागा पकडत ‘बापट तुम्ही किमान करंगळी पकडा, दिल्लीला जाल म्हणत पालकमंत्री गिरीश बापट यांना टोला लगावला आहे.