शरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे – निलेश लंके

स्वप्नील भालेराव /पारनेर :  गेली अनेक वर्षे मी राजकारणात सक्रिय आहे. खासदार शरद पवार साहेबांचे राजकारण पाहतोय त्यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून मी त्यांच्या सोबत काम करणार आहे अशी स्पष्टोक्ती निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही उपस्थित होते.यावेळी जयंत पाटील म्हणाले की , या पत्रकार परिषदेत लंकेची अधिकृत प्रवेशाची घोषणा नसून येत्या 31 जानेवारीत पारनेर येथे होणाऱ्या राष्ट्रवादी परिवर्तन मेळाव्यात ते जाहीर प्रवेश करतील.

पूढे बोलताना लंके म्हणाले की, मी 31 जानेवारीला 50-60 हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.त्यामुळे आता लंके विधानसभा अपक्ष लढवणार की कोणत्या पक्षात जाणार यावर पडदा पडलेला आहे. लंकेचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश निश्चित झाल्याने त्यांचे समर्थक जोमाने तयारीला लागलेले आहे.