रोहितला शरद पवार फिल्डवरचे धडे देत आहेत : सुप्रिया सुळे

टीम महाराष्ट्र देशा :राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु रोहित पवार कुठल्या मतदारसंघातून विधानसभा लढणार याबद्दल अजून निश्चित माहिती नाही. परंतु रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठकी घेवून मोर्चेबांधणी करत आहेत असं चित्र दिसत आहे.

रोहित पवार यांच्या उमेदवारीबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी ‘संधी कुणाला द्यायचा, तो अधिकार माझ्याकडे नाहीय. पण रोहित जर फिल्डवर जाऊन लोकांमध्ये काम करत असेल, तर ती आनंदाची गोष्ट आहे. आणि दुष्काळाच्या काळात, खडतर परिस्थिती असते, त्यावर मात करुन काम करायचं, हे प्रशिक्षण त्याला पवारसाहेबांकडून मिळतंय, ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. तो (रोहित पवार) एसीत स्लाईड्सवर दुष्काळ कसा असतो ते न पाहता, फिल्डवर जाऊन काय परिस्थिती आहे, हे पाहतोय. त्यामुळे एखादा युवक काहीतरी शिकू पाहतोय, कष्ट करु पाहतोय, तर मला माझ्यासाठी आनंदाची बाब आहे’. असं उत्तर दिले आहे.

दरम्यान, शरद पवार यांचे दुसरे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शरद पवार दुसऱ्या नातवालाही विधानसभा निवडणुकीत संधी देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहेLoading…
Loading...