शरद पवार हे भावी राष्ट्रपती – सुशीलकुमार शिंदें

sushilkumar shinde

पुणे: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते जरी प्रतिभा पाटील यांचा सत्कार होवू शकला नसला, तरी व्यासपीठावर उपस्थित भावी राष्ट्रपती शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे, म्हणत माजी केंद्रीयमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पवार हे भावी राष्ट्रपती असल्याच भाकीत केल आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज त्यांच्या जीवनावर आधारित ‘भारताची प्रतिभा’ या जीवनगौरव ग्रंथाच प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आल. यावेळी शिंदे बोलत होते.

सुशील कुमार शिंदे यांनी भावी राष्ट्रपती म्हणताच शरद पवार यांनी नकारार्थी हात दखवला, मात्र या नकारातच त्यांचा होकार असून आपण त्यांच्या करंगळीला धरून राजकारणात आल्याची आठवण शिंदे यांनी करून दिली. प्रतिभा पाटील जीवनगौरव ग्रंथ समितीतच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनके दिग्गज नेते उपस्थित होते.