थोड्याच वेळात उलगडणार शरद पवारांची ‘राज’की बात 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू असणारे राज ठाकरे आणि शरद पवार हे दोन नेते जर एकाच मंचावर असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष लागते. मात्र आज आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे राज ठाकरे हे आपल्या एका शब्दात अनेक अर्थ दाखवणारे राजकीय पंडित शरद पवार यांची मुलाखत घेणार म्हटल्यावर राज्याच्या इतिहासातील दुर्मिळ योगाचे साक्षीदार होण्याचा योग लाभणार आहे.

पुण्यातील बी एम सी सी महाविद्यालयाच्या मैदानावर ही ऐतिहासिक मुलाखत रंगणार आहे. खऱ्या अर्थाने कॉलेज जीवनातून शरद पवार यांनी याच कॉलेज मधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरवात केली होती. याच मैदानातून हजारो विद्यार्थ्यांचे संघटन करून शनिवार वाड्यावर मोर्चे काढले होते. आज त्याच मैदानात शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला ५० वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे आणि साहजिकच तोही राज ठाकरेंच्या स्टाईलने.

तसं पाहीलं तर यापूर्वी शरद पवार यांच्या हजारो मुलाखती आजवर झाल्या आहेत हजारो प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहेत तरिही आजच्या मुलाखतीची सर्व महाराष्ट्राला एवढी आतुरता का आहे ? का सगळ्याची कान ही मुलाखत ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत ? का एवढी उत्कंठा शिगेला पोचलीय ?  त्याचं एकच उत्तर आहे ते म्हणजे मुलारवात घेणारे आहेत … राज ठाकरे.

You might also like
Comments
Loading...