‘..ही तर शरद पवारांनी काँग्रेसला धमकी दिली आहे’, नारायणे राणेंनी दिला धोक्याचा इशारा

मुंबई : भाजपशी काडीमोड झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. पण यानंतर राजकीय वातावरणात मात्र एकच खळबळ उडाली होती. हे सरकार टिकणार नाही अशी टीका विरोधकांनी केली. पण त्यावर काल शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

‘हे सरकार टिकेल आणि पाच वर्षे काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करून सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नाही’, असे विधान पवार यांनी केले.

यावर भाजप नेते नारायणे राणे यांनी शरद पवारांच्या बोलण्याचा अर्थ काँग्रेस आणि शिवसेनेला समजावून सांगितला आहे. ‘शरद पवार कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे’ असा अन्वयार्थ राणेंनी लावला आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो’ असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.

शरद पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच
दरम्यान, शिवेसनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या चर्चेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘देशात एककल्ली कारभार सुरू आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

IMP