शरद पवारांचं सूचक वक्तव्य; एसटीचं विलीनीकरण केलं तर…

शरद पवारांचं सूचक वक्तव्य; एसटीचं विलीनीकरण केलं तर…

Sharad Pawar

सातारा: गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे संप (ST workers strike) सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे हाल तर होत आहेतच त्याच सोबत आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे देखील हाल होत आहेत. मात्र या गोष्टी राजकारणात आपली पोळी भाजून घेणाऱ्या नेत्यांना ही बाब कदाचित लक्षात येत नसावी म्हणून अद्याप या आंदोलनावर कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही.

आझाद मैदानावर सुरू असेलेले हे आंदोलन आणखी चिघळत जात असल्याचे चित्र दिसत आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी शरद पवार यांची या आंदोलनासंदर्भात भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी एसटी कामगारांच्या या आंदोलनावर सूचक भाष्य केलं आहे.

मेळाव्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतव शरद पवार बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एक बैठक घेतली असून त्यात काही पर्याय सूचवले होते. याआधी एसटी महामंडळाला सरकारच्या मदतीची गरज भासली नव्हती. राज्य सरकारने जी ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती तीसरकारने पगारासाठी मदत केली होती. पाच राज्यांच्या वेतनाचा विचार केला तर गुजरातमधील वेतन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे आणि इतर राज्यात जास्त आहे.

एसटीच्या विलिनीकरणावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी उत्तर देणं टाळलं. मात्र त्यांनी यावर बोलताना अगदी सूचक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र सरकारनं शेजारच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा अभ्यास करावा त्याच सोबत एसटीचं विलिनीकरण केल्यानंतर मग इतर अनेक मंडळांचं सरकारमध्ये विलिनीकरण करावं लागेल, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. मात्र या आंदोलनावर चर्चा करून तोडगा काढता येऊ शकतो, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या: