fbpx

शिरूर लोकसभेसाठी पवारांकडे असणारे ते ‘पाच’ प्रबळ चेहरे कोण , वाचा

शरद पवार

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी विद्यमान खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांना निश्चित आहे. मात्र त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. पक्षात असणारे मतदारसंघातील अनेक नेते लोकसभा लढण्यास उदासीन असल्याने नेमकी उमेदवारी कोणाला देयची हा प्रश्न राष्ट्रवादी पुढे आहे. मात्र आता शिरूरसाठी आपल्याकडे पाच – सहा प्रबळ चेहरे असल्याचं पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे ते चेहरे कोण असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या सहाही विधानसभांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत स्थितीमध्ये आहे. परंतु लोकसभेसाठी पक्षाकडे प्रबळ चेहऱ्याचा आभाव दिसून येतो. अनेक नेते आढळराव पाटील यांच्या विरोधात उभे राहण्यास नकार देत असल्याने मध्यंतरी अजित पवार यांनी पवार साहेबांनी आदेश दिल्यास शिरूरमधून लढण्याची गर्जना केली होती. मात्र आता अजित दादांना तिकडे जाण्याची गरज नसून पक्ष प्रबळ चेहरा देईल, असे विधान शरद पवार यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून पवार घराण्यातील कोणीही अथवा त्यांचा दुसरा उमेदवार जरी आपल्या विरोधात लढला, तरी मीच निवडून येणार असा विश्वास खा. आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

हे आहेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूरमधील प्रबळ चेहरे

दिलीप वळसे पाटील

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत असणारे दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क देखील चांगला आहे. परंतु आजवर अनेकवेळा त्यांनी आपण लोकसभा लढवणार नसल्याचं स्पष्ट केले आहे.

विलास लांडे

विलास लांडे हे भोसरी माजी आमदार आहेत. भोसरी, खेड, जुन्नर मतदारसंघामध्ये त्यांचा संपर्क आहे. लांडे हे लोकसभा लढवण्यास उत्सुक आहेत.

मंगलदास बांदल

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती राहिलेले मंगलदास बांदल हे राजकीय आखाड्यात आढळराव पाटील यांना चीतपट करण्यासाठी अनेक दिवसांपासून मेहनत घेत आहे. मध्यंतरी त्यांनी मनसेने उमेदवारी द्यावी म्हणून थेट राज ठाकरेंना जाहीर सभेत विचारणा केली होती. बांदल हे राष्ट्रवादीकडून लढू शकतात.

रोहित पवार

शरद पवार यांचे नातू असणारे रोह्त पवार यांनी शिरूरमधून निवडणूक लढवण्याची मागणी खेडचे माजी आ दिलीप मोहिते यांनी केली होती, मतदारसंघातील युवक कार्यकर्ताचा देखील रोहित यांच्या नावासाठी आग्रह आहे. पंरतु शरद पवार हे त्यांना उमेदवारी देणार नाही, ही शक्यता जास्त आहे.

अशोक पवार

शिरूर विधानसभेचे माजी आमदार अशोक पवार हे देखील राष्ट्रावादीकडून लोकसभेची उमेदवारी लढवण्याची शक्यता नाकरता येत नाही,

2 Comments

Click here to post a comment