मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली- शरद पवार

चला जाऊयात शरद पवारांच्या मामाच्या गावाला.

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मामाची किंवा मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी मिश्कील खंत व्यक्त केली. रविवारी सकाळी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावास भेट दिल्यानंतर व्यक्त केली.

शरद पवार यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सगळयांसाठी मामाच गाव हे एक विशेष ठिकाण असतो. शरद पवार यांनी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावास भेट दिली. तेव्हा गावातील नागरिकांनी गुढ्या उभारून व दारात रांगोळी, फुलांचा सडा घालून पवार यांचे जंगी स्वागत केले. झांज पथकाच्या नादात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिलांनी त्यांचं औक्षण केलं आणि ते व्यासपीठावर आले. हिरव्या साड्या परिधान केलेल्या महिला आणि फेटे घातलेले गावकरी शरद पवारांकडे डोळे भरुन पाहत होते.

गावाच्या वतीने शरद पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शरद पवार हे भारावून गेले होते. गोलिवडे गावाचा आपल्या आईचा ऋणानुबंध सांगत गावाशी असलेले नातेसंबंध उलगडले. तसेच आपल्या आईच्या अनेक आठवणींना पवारांनी उजाळा दिला.
गोलिवडे गावात यंदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यातच महिला सरपंचाची निवड देखील बिनविरोध करण्यात आली आहे. खरंतर या ग्रामपंचायतीचा आदर्श राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने घेतला पाहिजे. तसंच जिथं महिलेच्या हातात कारभार असतो तिथला कारभार नेहमीच नीट होतो, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. तसंच समाज समृद्धीच्या स्तरावर न्यायचा असेल तर घरातील प्रत्येक स्त्री ही शिकली पाहिजे असं शरद पवारांनी म्हटलं. कर्तृत्वाचा मक्ता हा पुरुषाबरोबर महिलेकडे असतो हे विसरुन चालणार नसल्याचं पवारांनी सांगितलं.

You might also like
Comments
Loading...