शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला

sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र तसेच देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या शब्दाला मोठा मान आहे. तसेच दिलेला शब्द पाळण्याची त्यांची खासियत आहे. पवार याचं क्रीडा क्षेत्रातील प्रेम देखील सर्वश्रुत आहे. याचच दर्शन सध्या पहायला मिळतय.

महाराष्ट्रातील मल्लांनी ऑलम्पिक सारख्या जागतिक स्पर्धामध्ये देशासाठी मेडल मिळवाव यासाठी प्रोत्साहन म्हणून चार मल्लांना दत्तक घेण्याची घोषणा त्यांनी केली होती. हाच दिलेला शब्द पाळत या मल्लांच्या प्रशिक्षकांना बोलावून शरद पवार यांनी २४ लाख रुपयांचा धनादेश दिला. यंदाचा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे यांच्या परदेशी प्रशिक्षणाचा खर्च शरद पवारांनी उचलला आहे.

अभिजीत कटकेचे प्रशिक्षक भरत म्हस्के तसेच राहुल आवारे, उत्कर्ष काळे आणि किरण भगत यांचे प्रशिक्षक अर्जुनवीर काका पवार यांनी हे धनादेश स्वीकारले.