शरद पवारांनी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांना दिला कानमंत्र

चर्चा तर होणारच

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांना कानमंत्र दिल्याच्या फोटो सोशल मिडीयावर फिरत आहे. पवारांनी नार्वेकरांच्या कानात काय सांगितलं? असा प्रश्न सर्वाना पडला आहे .

शरद पवारांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांना बोलावून, त्यांच्याशी चर्चा केल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा चांगल्याच रंगू लागल्या आहेत. अनेक बड्या नेत्यांच्या हालचाली पाहायला मिळत आहेत. नुकतीच राज ठाकरेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट त्यानंतर युवराज संभाजीराजे यांचा शरद पवारांसोबत दिल्ली ते मुंबई प्रवास. यामुळे शरद पवार साहेब नवीन राजकीय समीकरण आखत आहेत का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. या सर्व राजकीय घटनांमध्ये शरद पवार केंद्रस्थानी आहेत त्यामुळे चर्चा तर होणारच.

मनोहर जोशींच्या ‘अवघे पाऊणशे वयमान’ पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पार पडले. दरम्यान, शिवाजी मंदिराच्या पार्किंगमध्ये शरद पवारांनी शिवसेनेचे सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणारे मिलिंद नार्वेकर यांना बोलवून घेतले आणि कानमंत्र दिला. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आल आहे. उलट सुलट राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. यापूर्वी देखील पवारांनी राज ठाकरे यांच्या बरोबर झालेली चर्चा गुपित ठेवली आहे.