fbpx

मराठा समाजाचा असंतोषाला मुख्यमंत्रीच जबाबदार, शरद पवार यांनी फडणवीसांना फटकारले

sharad-pawar

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्री मराठा आंदोलनाचे गांभीर्य समजण्याऐवजी चिथावणीखोर विधान करत आहेत, त्यामुळे मराठा समाजात निर्माण झालेल्या असंतोषाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार असल्याचा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार यांनी मराठा आंदोलकांना निवेदन देखील केले आहे. तसेच सरकारने आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असेही म्हंटले आहे. मराठा समाजातील तरुणांनी आजवर कायदा सुव्यवस्था हातात न घेता शांततेच्या मार्गाने आरक्षणासह आपल्या इतर मागण्या मांडल्या. मात्र, त्यांच्या अस्वस्थतेची दखल न घेतल्याने काहींनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. सरकारकडून त्याचीही दखल घेतली न गेल्याने सध्या उद्रेकाची स्थिती निर्माण झाल्याच, शरद पवार म्हणाले.

दरम्यान, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्यसरकारने आंदोलनात सहभागी महत्त्वाच्या घटकांना त्वरित बोलावून त्यांच्याशी संवाद साधून मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळावे व सर्वसामान्यांना या आंदोलनाची झळ बसणार नाही याची खबरदारी घ्यावी. या आंदोलनाला आजवर सर्वसामान्यांची असलेली सहानुभूती आंदोलनकर्त्यांनी टिकवून ठेवावा, असा सल्ला शरद पवार यांनी आंदोलकांना दिला आहे.