शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी पक्षाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी आणि पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस मास्टर पितांबर यांच्याकडे सादर केला.

लोकशाही मुल्याप्रमाणे दर तीन वर्षाने पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. माजी कृषीमंत्री शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. ३० एप्रिल रोजी मतमोजणी नंतर  अध्यक्षपदाची घोषणा होणार आहे. तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचीही निवड होणार असून २९ एप्रिलला निवडणूकीबाबत बैठक होणार आहे.

अर्ज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, खासदार माजीद मेमन, प्रवक्ते संजय तटकरे,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ अर्ज दाखल करतांना उपस्थित होत्या.