औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेते आणि विरोधी पक्षांचे नेते आमने-सामने आल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.
मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शरद पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ‘ज्यामध्ये शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस सरकार बनवणार का?’ या प्रश्नावर उत्तर देत शरद पवार म्हणाले की, ‘राष्ट्रवादी शिवसेनेसोबत तसेच भारतीय जनता पक्षासोबत कधीच सरकार बनवणार नाही.’
दरम्यान, या व्हिडीओला ‘साहेब हे विसरलेतं वाटतं…! रोज रोज मीडिया समोर येऊन किमान आपलं वाक्य तरी साहेबांनी लक्षात ठेवायचं होतं’, असे कॅप्शन खांबेकरांनी दिले आहे. तसेच खांबेकरांनी शेअर केलेल्या या व्हिडिओनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “काका धर्माला वाचवा”, सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना खोचक टोला
- IPL 2022: ललित यादवच्या रन आऊटवरून गोंधळ; पंतची अंपायरशी हुज्जत, वाचा नेमके काय झाले?
- “जिल्हाध्यक्ष हटाव राष्ट्रवादी काँग्रेस बचाव” – पोस्टर्समुळे उडाली खळबळ
- “पाकिस्तानची संसद बरखास्त करा” – इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस
- चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचा जोरदार टोला; म्हणाले,“आता धौती योग घेतल्याशिवाय पर्याय नाही”