शरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही : उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुणेरी पगडी परिधान करण्यात येत होती. भुजबळांना पुणेरी पगडी परिधान करणाऱ्या व्यासपीठावरील मान्यवरांना पवारांनी रोखलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील कार्यक्रमांमध्ये पागोटंच वापरलं जाईल, अशी घोषणा त्यावेळी मंचावरुन त्यांनी केली. पवारांच्या या सांकेतिक राजकारणावर उद्धव ठाकरेंनी आज निशाणा साधला आहे. पगड्यांचं राजकारण करणाऱ्या शरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान, पुणेरी पगडी नाकारुन पागोट्याला पसंती देण्याची शरद पवारांची कृती अतिशय चर्चेत राहिली होती. यावरुन उद्धव ठाकरेंनी पवारांची शाळा घेतली. पगड्यांचं राजकारण करु नका, असा सल्ला यावेळी उद्धव ठाकरेंनी पवारांना दिला. ‘पगड्यांपेक्षा त्या परिधान करणाऱ्या व्यक्तींच्या विचारांनी पुढे जायला हवं. लोकमान्य टिळकांनी ‘इंग्रज सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारला होता. पवारांना तोदेखील प्रश्न विचारता येत नाही. कारण डोकं ठिकाणावर असायला आधी डोकं असावं लागतं. पवारांना डोकं नावाचा प्रकारही नाही,’ अश्या पद्धतीने घणाघात हल्ला उद्धव ठाकरेंनी केला.

सध्या देशातील वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांना अघोषित आणीबाणीचा सामना करावा लागत असल्याचं म्हणत दुसरीही आणीबाणी येत आहे, ती मोडून काढा, जुमलेबाजीनं आपला घात केलाय, असंही ते म्हणाले. ‘मोदी सरकारकडून जोरदार जाहिरातबाजी सुरू आहे. मोदींच्या दाव्याची पडताळणी करुन सत्य समोर आणणाऱ्या पत्रकारांना घरचा रस्ता दाखवला जात आहे,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही शाळा घेतली.

56 इंचाच्या छातीपेक्षा, छातीवर मेडल्स असणारी माणसे जास्त महत्वाची – उद्धव ठाकरे

‘सावजाची शिकार मीच करीन’ – उद्धव ठाकरे