‘या’ कारणामुळे गेले नाहीत शरद पवार राहुल गांधीच्या इफ्तार पार्टीला…

नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या रोजा-इफ्तारमध्ये का गेले नाही ? याची राजकीय वर्तुळात चांगलीच उलट सुलट चर्चा रंगली होती. मात्र शरद पवार उपस्थित न रहाण्याचे वेगळेच कारण आहे.

मुंबईत होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले होते. हे निमंत्रण पवार यांनी आधीच स्वीकारले होते. त्यामुळे शरद पवार राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या रोजा-इफ्तारमध्ये गेले नाहीत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने जोरदार तयारी सरू केली आहे. सर्व विरोधीपक्षांना एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नात आहेत. त्यामुळे आयोजित केलेल्या रोजा-इफ्तारमध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तथा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह जवळपास सगळेच विरोधी पक्षनेते उपस्थित होते. मात्र शरद पवार नसल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली होती.