fbpx

शरद पवारांनी शक्य असूनही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही : विनायक मेटे

vinayak mete

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती आवश्यक आहे, असे मत शरद पवारांसह अनेक नेत्यांनी मांडले होते. मात्र, घटनादुरुस्ती ही काही सोपी बाब नाही. शरद पवारांनी शक्य असूनही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, असा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर मोठा वणवा पेटला असून अनेक ठिकाणी हिसाचार होताना पहायला मिळतंय.काही आंदोलकांनी तर आत्महत्या देखील केल्याने मराठा तरुणांच्या रोषाचा भडका उडाला आहे या पाश्वभूमीवर मराठा समाजाला शांत करण्याची गरज असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे. मराठा तरुणांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला दया

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे ही स्टंटबाजी ?