शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पवार-फडणवीस भेट

शरद पवार यांच्या 6 जनपथ निवासस्थानी शेतकरी कर्जमाफीवर आयोजित  बैठक संपल्यावरही पाऊण तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात झालेली गुफ्तगु चर्चेचा विषय बनली आहे. या गुफ्तगुमध्ये नेमके काय झाले, हे अद्याप बाहेर आलं नसलं तरीही शेतकरी आंदोलनावरून भाजप सरकार अडचणीत आले असताना  शरद पवार यांची मनधरणी करून कर्जमाफीचा मुद्दा तडीस लावण्यावर भाजप भर देत असल्याचे कळते.
तर दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांसोबत मॅराथाॅन बैठका घेऊन कर्जमाफीचा तोडगा काढण्यात येत असल्याचे वक्तव्य चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याच पाटील यांनी स्पष्ट केलं.
नक्की काय म्हणाले आहेत  चंद्रकांत पाटील
, “महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफीमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल, याबाबत आम्ही मॅरेथॉन भेटी घेत आहोत.  काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहोत. विखे पाटील, धनंजय मुंडे, राजू शेट्टी यांच्याही भेटी घेतल्या. त्याप्रमाणे आज शरद पवारांची भेट घेतली.आम्ही 30 जून 2016 पर्यंतचा थकित शेतकरी जो आहे, तो 83 टक्के आहे. त्याचं 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत. त्यासाठी 25 हजार कोटी रुपये लागतील. या व्यतिरिक्त ज्यांनी नियमित कर्ज भरलं, त्यासाठी आम्ही वेगळं पॅकेज तयार करतोय. याबाबत आम्ही चर्चा केली. आम्ही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्याबाबतच पुन्हा उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार आहोत असं  पाटील यांनी स्पष्ट केलं[jwplayer acWdr77l]