“महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या”

sharad-pawar

सोलापूर : महिलांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती, जिल्हा परिषद सदस्य शीतलदेवी मोहिते यांनी दिली.

शीतलदेवी मोहिते म्हणाल्या, शरद पवार यांनी अनेक पुरोगामी निर्णय घेतले आहेत. विविध क्षेत्रात महिलांना संधी देण्यासंदर्भात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ते सध्या राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आहेत. महिलांच्या केसरी कुस्ती स्पर्धेसंदर्भात त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आम्ही अकलूज येथे ताराराणी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करत आहोत. स्पर्धेचा निर्णय झाल्यास पहिल्या स्पर्धेच्या आयोजनाचा मान आमच्या केंद्रास द्यावा. खासदार विजयसिंह मोहिते यांच्या माध्यमातून याबाबत पाठपुरावा करू. पत्रकार परिषदेस धैर्यशील मोहिते, उपाध्यक्ष शिवदास शिंदे, प्रा. विश्वनाथ आव्हाड, ताराराणी कुस्ती केंद्राच्या प्रशिक्षक कौशल्या वाघ आदी उपस्थित होते.

Loading...