‘आपण सर्वांनी एकदा ठरवलं तर भाजपला सत्तेवरून हाकलायला वेळ लागणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्याच्या दोऱ्यावर आहे. तसेच पडझड रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी शरद पवार दौऱ्यावर आहेत. तसेच कार्यकर्त्यांशी सवांद साधत आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना पवार म्हणाले, शहा उद्योगपतींचं कर्ज माफ करताहेत पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही अशी त्यांची भूमिका आहे, असे पवार यावेळी म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर अन्न-पाणी मिळते त्याच शेतकऱ्यांना हे लोक विसरतात. तुम्ही आम्ही एकदा ठरवलं तर भाजपला सत्तेवरून हाकलायला वेळ लागणार नाही असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.

दरम्यान, फक्त बटन दाबायची वेळ येऊ द्या, मग यांचा विकास कुठे पाठवायचा ते आपण ठरवू. कुठे पळापळ झाली तरी जालन्यातील राष्ट्रवादीचा कोणीही कुठे जाणार नाही याचा मला विश्वास आहे, असे यावेळी शरद पवार म्हणाले.