‘फक्त बटन दाबायची वेळ येऊ द्या, मग यांचा विकास कुठे पाठवायचा ते आपण ठरवू’

ncp shard pawar

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्याच्या दोऱ्यावर आहे. तसेच पडझड रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी शरद पवार दौऱ्यावर आहेत. तसेच कार्यकर्त्यांशी सवांद साधत आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भाजप सरकार वर शाब्दिक निशाणा साधला आहे. पवार जालन्यात कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, फक्त बटन दाबायची वेळ येऊ द्या, मग यांचा विकास कुठे पाठवायचा ते आपण ठरवू. कुठे पळापळ झाली तरी जालन्यातील राष्ट्रवादीचा कोणीही कुठे जाणार नाही याचा मला विश्वास आहे, असे यावेळी शरद पवार म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, जाताना नेते म्हणतात पवार माझ्या ह्रदयात आहेत. मी जर तुमच्या ह्रदयात आहो तर मग पक्ष का सोडून जात आहात असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, आघाडीचे सरकार आल्यास सर्वाना सरसकट कर्जमाफी देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. जालना येथे शुक्रवारी आयोजित कार्यकर्ता मेळ्याव्यात ते बोलत होते.