वंचित आघाडीची नियत साफ नाही : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत डॉ. प्रकाश आंबेडकर निर्मित वंचित आघाडीतने कॉंग्रेस आघाडीला चांगलाच धक्का दिला होता. पहिल्याचं निवडणुकीत वंचित आघाडीने अनेक मतदारसंघांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मत मिळवली होती. यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात पवार बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी म्हणून नवीन एक पार्टी आली आहे . वंचित ज्या पद्धतीने जात आहे त्यांची नियत साफ नाही असं चित्र दिसत आहे. कारण वंचितकडून सेक्युलर असे सांगत असले तरी, अप्रत्यक्षरीत्या ते भाजपचाच फायदा करून देत आहेत. तसेच या मेळाव्यात शरद पवार यांनी देशातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक बदलांवर भाष्य केले.देशात जर जन्मला तर त्या व्यक्तीला मी हिंदुस्तानी आहे असं त्याला का बोलायला सांगितलं जातं. हे अतिशय वाईट आहे . या पूर्वी मी कधी मॉब लिचिंग हा शब्द ऐकला नव्हता. पण सध्या त्याच प्रमाण वाढत आहे, असे पवार म्हणाले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीने वंचित आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वंचित आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ताठर भूमिका घेत कॉंग्रेस आघाडी सोबत जाण्याचे टाळले. तर दुसरीकडे वंचित आघाडी आणि एमआयएममध्ये फुट पडल्याने कॉंग्रेस आघाडीचा धोका अजूनच वाढला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही वंचित आघाडी स्वतंत्र लढत युती आणि आघाडीला टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहे.