पक्ष सोडून गेलेले लोक महिनाभरात इतिहासजमा होतील – शरद पवार

blank

टीम महाराष्ट्र देशा : कोणी पक्षाला सोडून गेले, कोणी गद्दारी केली चिंता करू नये, सोलापूर जिल्हा हा स्वाभिमानी आहे, येथील माणूस एखाद्यावेळी गरीब असेल पण लाचार नाही. मावळणाऱ्यांची चर्चा करू नका, उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याकडे लक्ष द्या, पक्ष सोडून गेले ते लोक महिनाभरात इतिहासजमा होतील. असा संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार गळती लागली आहे. पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडत भाजप – शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर सुरु असणारी पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “पक्ष सोडून गेले ते लोक महिनाभरात इतिहासजमा होतील, त्यांची चर्चा करू नका. येणाऱ्या लोकांची चर्चा करा. लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्यांना आता लोकच जागा दाखवणार असून मी काय म्हातारा झालोय का ? अजून तरुणाईच्या जोरावर अनेकांना घरी पाठवायचं” असा जोरदार घणाघात शरद पवारांनी केला आहे.

दरम्यान, पवारांना काय काम केलं या भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रश्नालाही शरद पवारांनी उत्तर दिलं. जे काही केलं ते बरं वाईट केलं, मात्र कधीही तुरुंगात गेलो नाही, असं म्हणत पवारांनी शाहांना टोला लगावला.

महत्वाचा बातम्या