Sharad Pawar | मुंबई : कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावर महाराष्ट्रातील विरोधीनेते आक्रमक झाले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटक सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
‘सध्याच्या वादामध्ये कर्नाटक सरकार आहे की नाही, याचे ठोस पुरावे आपल्या हातात नाहीत. त्यामुळे आपण कर्नाटक सरकारचे थेट नाव घेऊ शकत नाही, असे विधान मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. त्यावर तुमचे मत काय?’ असा प्रश्न पत्रकाराने विचारला. यावर उत्तर देत त्यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना टोला लगावला आहे. “मी छोट्या माणसांबाबत काही बोलत नाही, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत
पुढे ते म्हणाले, “केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरू होत आहे. राज्यातील सर्व खासदारांना आम्ही सांगणार आहोत की तुम्ही या विषयी भूमिका मांडा आणि हा विषय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर घाला. आम्ही परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न करणार पण यश आलं नाही आणि कोणी कायदा हातात घेतला तर जबाबदारी केंद्र आणि कर्नाटक सरकारची असेल.”
“देशाला ज्यांनी संविधान दिलं. थोर महात्म्याच्या स्मरणाच्या दिवशी जे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडलं ते निषेधार्ह आहे. हे प्रकरण काही आठवड्यापासून एका वेगळ्याच स्वरुपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आहे”, असा दावाही शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना केलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Sudhir Mungatiwar | “कर्नाटक सरकारने अशा गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी”, सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा
- Sharad Pawar | “येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही तर…”; शरद पवारांचा इशारा काय?
- Rohit Patil | “कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध, सत्तारुढ पक्षांनी…” ; रोहित पाटील आक्रमक!
- Devendra Fadanvis | कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेल्या दगडफेकीनंतर देवेंद्र फडणवीसांचा बोम्मईंना फोन
- Sanjay Raut | “महाराष्ट्र पेटला तर…” ; कर्नाटक वादावरुन संजय राऊत यांची शिंदे सरकारवर जहरी टीका