fbpx

शरद पवारांचा फेसबुक लाईव्हवरून प्रकाश आंबेडकरांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मिडिया या प्रभावी अस्त्राचा वापर केला आहे. त्यांनी आज आपल्या Sharad Pawar Live या फेसबुक पेजवरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच लोकांच्या प्रश्नांचीही उत्तरं दिली. तसेच पवारांनी वंचित बहुजन आघाडीवर देखील भाष्य केले.

वंचित आघाडी ही जे सत्तेत आहेत त्यांच्यावर टीका न करता आमच्यावर टीका करत आहे, असे म्हणत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकर यांना फटकारले आहे. कारण वंचित आघाडीने घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत वारंवार शरद पवारांवर टीका केली आहे. या टीकेला उत्तर देत पवार यांनी चांगलचं फटकारले आहे.

दरम्यान सोशल मिडीया या अस्त्राचा वापर करत भाजपने २०१४ मध्ये तरुणांशी जोडले जात यश संपादन केले. तर राजकारणात नव्याने जनसंपर्क शैलीचा वापर केला.त्या तुलनेत या तंत्राचा प्रभावी वापर करणं विरोधकांना जमलं नाही. याचा त्यांना निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी काळात असा फटका बसू नये म्हणून शरद पवार यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.