दिल्लीत गेल्यावर त्याला सांगेन लोकाच्या घरच्या चौकशा करणं म्हणजे काय असत : शरद पवार

टीम महारष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील आणि राज्यातील राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा चांगलाच धडाका लावला आहे. तर राज्यात यंदाच्या निवडणुकीत पवार आणि मोदी यांच्या मध्ये शाब्दिक युद्ध पाहिला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेत सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष करताना दिसत आहे. त्यावर आता शरद पवार आपल्या मिश्कील शैलीतून प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. मोदींनी या वयात असं वागणं बरं नव्हे, अस म्हणत पवारांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना फटकारले आहे.

सध्या नरेंद्र मोदी प्रचारा निमित्त राज्यात प्रचार सभा घेत आहेत. मात्र या प्रचार सभांमध्ये नरेंद्र मोदी हे शरद पवार यांना विशेष लक्ष करत आहेत. त्यावरचं आज शरद पवारांनी माढा येथील एका प्रचार सभे मध्ये भाष्य केले आहे.

यावेळी पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसात नरेंद्र मोदी वारंवार प्रचारासाठी महाराष्ट्रात येत आहेत. मात्र त्यांनी केलेल्या कामांच्या प्रचारापेक्षा ते माझ्याच घरावर जास्त बोलत आहेत. मात्र त्यांना घराचा काय अनुभव आहे, असा टोला पवारांनी लगावला. तर पवार पुढे म्हणाले की, माझ्या कुटुंबाचा बारदाना मोठा आहे. हा फकीर याला घर कसले, निदान आम्हाला तरी दिसले नाही. आता दिल्लीत गेल्यावर त्याला सांगेन या वयात लोकांच्या घरच्या चौकशा करणं, असं वागण या वयात बरं नव्हे, अशा शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली.

दरम्यान शरद पवार आज माढा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा प्रचारार्थ आले होते.आज पवारांनी सांगोला तालुक्यातील कोळा येथे संजय शिंदे यांचा जोरदार प्रचार केला. यावेळी माढा लोकसभा मतदार संघामध्ये आघडी आणि युतीकडून नवखे उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. त्यामुळे माढ्यामध्ये आघाडी आणि युतीकडून जोरदार प्रचार पाहिला मिळत आहे.