आश्वासनं पूर्ण नाही केली तर फटके मारा असं म्हणणाऱ्या मोदींना सांगा कोणत्या चौकात बोलवायचं ?

ncp shard pawar

टीम महाराष्ट्र देशा – लोकांनी मोदींना संधी दिली पण त्यांनी भ्रमनिरास केला, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. निफाडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. देशाची अर्थव्यवस्था सुधाऱण्यासाठी मला फक्त 60 दिवसांची मुदत द्या, आश्वासनं पूर्ण नाही केली तर फटके मारा असं मोदी म्हणाले होते, आता त्यांना कोणत्या चौकात बोलवायचं असा सवाल उपस्थितीत करत पवारांनी मोदींवर घणाघाती टीका केली.

Loading...

धनराज महाले यांना मतदान करा. घड्याळाचे बटण दाबा कारण आम्हाला या देशाच्या संसदेत शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, छोटे व्यावसायिक यांच्या हिताची जपणूक करणारी एक लॉबी हवी आहे असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेच्या व्यासपीठासमोर शेतकऱ्यांच्या भीतीपोटी खंदक खंदून ठेवल्याने शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच पिंपळगाव येथे पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी कांदा मार्केट बंद ठेवण्याचा आदेश शासनाने काढला. शेतकऱ्यांचे या दिवशी झालेले नुकसान कोण भरून देणार अशी विचारणा शरद पवार यांनी सभेतून केली.Loading…


Loading…

Loading...