पाच रुपये घ्या आणि मठात बसा,पवारांनी उडवली जयसिदेश्वर महाराजांची खिल्ली

सोलापूर – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार करताना एकमेकांची उनिधुनी काढली जात आहेत. यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तरी कसे मागे राहतील? भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिदेश्वर महाराजांची चांगलीच खिल्ली उडविली आहे. “महाराज, तुम्ही पाच रुपये घ्या आणि मठात बसा. महाराज मंडळींनी राजकारणाच्या फंद्यात पडू नका.”, असं म्हणत पवार यांनी डॉ. जयसिद्धेश्वर महाराजांची टिंगल केली आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शरद पवार बोलत असताना पवारांनी महाराजांवर टीकास्त्र सोडले. साधू संत कधी कोणाकडे मागत नाहीत, मागणारा संत असूच नाही. सोलापुरात मला मताचा शिक्का द्या म्हणणारा महाराज मी देव आहे, असे सांगत असल्याचे वाचले. राजकारण हे महाराजांचे काम नाही व ही भोंदुगिरी समाज आणि देशाच्या हिताची नाही असं देखील ते म्हणाले.

दरम्यान,निवडणूक लढविणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. राजकारण ही काही विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी आहे का? असा देखील सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.