fbpx

मुख्यमंत्री विरोधी आमदारांना फोन करतात; शरद पवार यांचा फडणवीसांवर आरोप

harad pawar and devendra fadanvis 1

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तसेच इतरही अनेक नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. यावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी ‘मुख्यमंत्री स्वत: विरोधी आमदारांना फोन करत आहेत. विरोधी पक्षातील आमदारांना ईडीद्वारे धमकावलं जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी सुरू आहे. या फोडाफोडीसाठी अनेक सहकारी संस्थांसह बँकांचाही गैरवापर भाजपकडून होत आहे. अस विधान केले आहे.

दरम्यान, नगरचे आमदार संग्राम जगताप आणि साताऱ्याचे शिवेंद्रराजे हे पक्षांतर करण्याच्या तयारीत होते. परंतु ते आता कुठेही जाणार नाहीत असंही पवार यांनी स्पष्ट केले आहे.