fbpx

मात्र निवडणूका आल्या की त्यांच्या अंगात येतं ; पवारांचा मोदींना टोला

बारामती: नरेंद्र मोदी इतर वेळी ठीक असतात, मात्र निवडणूका आल्या की त्यांच्या अंगात येत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसेच “मोदी साहेब आमचं घर भरलेलं घर आहे, ज्यांच्या घरात कोण आहे की नाही हेच देशाला माहित नाही त्यांनी इतरांच्या घराबद्दल बोलू नये” असा कणखर टोला देखील पवारांनी मोदींना लगावला आहे.

आज बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेस शरद पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा आणि भंडारा येथील प्रचार सभेत शरद पवारांवर वैयक्तिक टीका केली होती. या टीकेला पवारांनी जोरदार उत्तर दिले. नरेंद्र मोदी भेटल्यावर त्यांना माझ्या कुटुंबाबद्दल माहिती देईल, असेही पवार म्हणाले.