मुलालाच पक्षात घेऊ शकत नाही मग पक्ष स्थापनेचा काय उपयोग; शरद पवारांची नारायण राणेंवर टीका

मुंबई : ‘नारायण राणे हे आपल्याच मुलाला पक्षात घेऊ शकत नाहीत तर नवीन पक्ष काढण्याचा काय उपयोग’ म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राणेंना टोला लगावला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या नवीन ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्षाची स्थापना केली आहे. मात्र त्यांचेच पुत्र आमदार नितेश राणे यांनी अजूनही कॉंग्रेस आमदार पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे अद्याप नितेश यांचा वडीलांच्याच पक्षात प्रवेश झालेला नाही. यावरून आता शरद पवार यांनीही राणे यांना टार्गेट केलं.

मुंबईत आयोजित राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना शरद पवार यांनी सरकारलाही चांगलंच धारेवर धरले. एल्फिन्स्टन अपघाताची जबाबदारी घेत रेल्वेमंत्री राजीनामा देतील अस वाटलं होतं. मात्र त्यांनी जबाबदारी घेतलीच नसल्याची टीका त्यांनी केली. तर बुलेट ट्रेनचा सर्वाधिक फायदा गुजरातला असतानाही दोन्ही राज्यांनी मिळून 35 हजार का देयचे असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे.