निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा मुद्दा काढला जात आहे : पवार

कोल्हापूर – निवडणूक आल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा काढला जात आहे. भाजपकडे साडेचार वर्षात सांगण्यासारखं काही नाही, म्हणून काँग्रेसमधील एका घराण्यावर टीका करत आहेत तर दुसरीकडे धर्माचा आधार घेऊन राजकारण करत आहेत. त्यामुळे 10 डिसेंबर रोजी सगळे विरोधी पक्ष पुन्हा एकदा दिल्लीत एकत्र बसणार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्ववादाचा मुद्दा पुढे करून नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपा आणि शिवसेना करत असल्याचा आरोप पवार यांनी केलेला आहे.दरम्यान,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांच्या दोन दिवसांच्या या दौऱ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी नटली असून जागोजागी सडा-रांगोळ्या, भगव्या पताका, स्वागताचे प्रचंड मोठे फ्लेक्स अयोध्या नगरीत लागले आहेत. प्रचंड मोठ्या संख्येने साधू-संत-महंत, शिवसैनिक आणि हिंदू बांधव शरयू तीरावरील या तीर्थनगरीत दाखल झाले आहेत.

Loading...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज शनिवारी प्रभू रामचंद्रांच्या पवित्र अयोध्यानगरीत आगमन होत आहे. रामाचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांना राममंदिराची आठवण करून देण्यासाठी अयोध्येत दाखल होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाविषयी संपूर्ण उत्तर प्रदेशात जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली असून ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी रामजन्मभूमी दुमदुमून गेली आहे.

‘अयोध्येतच जातोय, बारमध्ये नाही! बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते…आम्ही येतो, आम्ही येतो!’

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील