fbpx

जे लोक कधी टोपी घालत नव्हते ते आज इफ्तारची दावत ठेवत आहेत; पवारांचा संघावर हल्लाबोल

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रमजाननिम्मित मुस्लिम बांधवांसाठी इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की , मागील अनेक वर्षापासून आम्ही हज हाऊस येथे रमजानच्या पवित्र महिन्यात दावत आयोजित करतो. असे एकही वर्ष नाही की आम्ही ही दावत आयोजित केली नाही. या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व बांधवांचे मी आभार व्यक्त करतो. दरम्यान यावेळी बोलताना पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला आहे.

आरएसएसकडून नागपूरमध्ये रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते त्यावरून पवार यांनी संघावर टीका केलीये. नागपुरात प्रतिगामी विचारसरणीची संस्था यंदा रोजा इफ्तारचे आयोजन करत आहे. हा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. जे लोक कधी टोपी घालत नव्हते ते इफ्तारची दावत ठेवत आहेत, ही थट्टेची बाब नाही का ?. यांचे मन साफ नाही म्हणून हे प्रकार सुरू आहेत. ही परिस्थिती लवकरच बदलावी अशी प्रार्थना. अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली.