fbpx

आम्ही कोणाची कळ काढत नाही, आमची काढली तर त्याची जागा दाखवतो – पवार

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान मोदी मी संरक्षण मंत्री असताना काय केल विचारतात, मी मंत्री असताना असे हल्ले करण्याची हिम्मत पाकिस्तान करत नव्हता. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहणारे असून, पहिलं कोणाची कळ काढत नाही, पण कोणी आमची काढली तर त्याची जागा दाखवतो, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. उस्मानाबाद येथे आयोजित सभेत ते बोलत होते . नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षात किती हल्ले झाले हे सांगाव, असा प्रश्न देखील पवार यांनी विचारला आहे.

कॉंग्रेसने हिंदुसाठी काय केल म्हणत समाजात दरी निर्माण करण्याच काम केलं जात आहे, मोदिंनी देशाला कर्जबाजारी केल आहे. ७० वर्षात देशावर पावणेतीन लाख कर्ज होते, मोदींनी मागील साडेचार वर्षात पाच लाख चाळीस हजार कोटींचे कर्ज सर्वांच्या डोक्यावर बसवले आहे, जागतिक बँकेने जगात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश म्हणून भारताला संबोधल आहे. अशी टीका पवार यांनी यावेळी केली.

मोदी साहेब सगळीकडे जाऊन सत्तर वर्षात काय केल विचारतात, या सत्तर वर्षात पाच वर्ष वाजपेयी देखील पंतप्रधान होते. मग त्यांनी झोपा काढल्याचं आम्ही म्हणत नाही. मोदींकडे मागील पाच वर्षात काय केल हे सांगण्यासाठी नसल्याने विरोधकांवर टीका करत आहेत, शेतकरी, शेतीमाल, दुष्काळ, नौकरीवर बोलत नाहीत. गांधी नेहरू घराण्याला शिव्या घालण्याचा काम फक्त ते करतात. असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला.

मोदींना देशाचा इतिहास देखील माहित नाही, जेंव्हा पाकिस्तानने देशात लोक पाठवले तेव्हा त्यांना माघारी बोलवण्यास इंदिरा गांधी यांनी सांगितले होते, मात्र पाकिस्तानने नकार दिला, त्यामुळे मोठे युद्ध झाले, या युद्धात इंदिरा गांधीनी इतिहास नाही तर भूगोल घडवल्याची आठवण शरद पवार यांनी करून दिली. .