‘मी खुप राजकारण बघितलं पण आता सत्तेवर असणाऱ्यांचं राजकारण वेगळचं’

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरु झाल्या आहे. तसेच मतदारसंघात जम बसवण्यासाठी नेते मंडळींच्या हालचाली जोमाने सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्याच्या बिकट परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आता मैदानात उतरणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी आता एकत्र येऊन काम करायला हवं असे ते म्हणाले. पवारांच्या या विधानाने सिद्ध होत की, नव्या जोशाने, नव्या जोमाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्रीय होताना पाहायला मिळणारा आहे.

तसेच पुढे बोलताना शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर थेट टीका केली. यावेळी ते म्हणाले की, मी खुप राजकारण बघितलं पण आता जे सत्तेवर आहे यांचा राजकारण वेगळच आहे असे म्हणत पवारांनी भाजप-शिवसेनेला टोला लगावला आहे.

दरम्यान, मंगळवारपासून शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांत बैठका घेऊन नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.